काय होतय तेच कळत नाहीये
इवल्याशा झुळकीबरोबर डुलणारं माझं मन
आज वाऱ्यानेही वळत नाहीये
आज स्वतःला व्यक्त करायला शब्दांचं
भांडारही पुरत नाहीये
खरचं काय होतय तेच कळत नाहीये..
कुणाची आठवण आहे की एखादी
लक्षवेधी आठवणींची साठवण तेच कळत नाहीये
छोट्याश्या विनोदावरही खळखळुन हसणारं माझं मन
आज मोठय़ा विनोदानेही ढळत नाहीये
खरचं काय होतय तेच कळत नाहीये..
हव्या असलेल्या गोष्टी पळत जाऊन घेणारं माझं मन
आज जवळ असलेल्या आनंदालाही धरत नाहीये
नेहमी इतरांची मन खुलविण्यात गुंतलेल्या माझ्या मनाला
आज रुसायलाही एखादं मन मिळत नाहीये
खरचं काय होतय तेच कळत नाहीये...!
Kharach... Kahich kalat nahiye!..
ReplyDeletePan Mast shabdbandhani evdhach kalatay...