Wednesday, 27 June 2018

एक माणूस

एक माणूस
हाच राक्षस
हाच सज्जन
हाच संत
हाच देव

माणूस हाच
मी लहानपनापासून पाहत आलेला
माझ्यावर भरभरून प्रेम करणारा
आता माझ्या प्रेमासाठी आसुसलेला

माणूस हाच
तेंव्हाचा handsome
गालात खुदकन हसणारा
आता वयोमानानुसार
गाल आत ओढत चाललेला

माणूस हाच
याआधी अश्रू दुर्मिळ असणारा
आता प्रत्येक निरोपास
डोळे ओले करणारा

जेव्हा
अजूनही माझ्या प्रचंड
धाडसाचा स्रोत बनतो
तेव्हा मन म्हणते..
माणूस हाच☺️