Friday, 27 November 2015

रंग

प्रेम जुमानतं का रंगाला..?
प्रेम.. आंधळच ते...
भुलत नाही ते
चेहर्‍याच्या सुंदरतेला

प्रेम करणाऱ्यांची
दुनियाच रंगीन असते
प्रेमच असते
जे जीवनात रंग भरते

म्हणून काही प्रेम
रंगांधळे नसते
त्यालाही कळतात रंग
रंग मनाचे

दोन रंग वेगवेगळे
एका नव्या रंगाला जन्म देतात
तेव्हा किती सारं प्रेम मिळत
त्या नवजात रंगाला

जर प्रेम जुमानत
असत रंगाला
तर राधा भाळली असती
का कृष्णाला ?

त्याचा काळा अन तिचा
रंग गोरापान असला
तर हमखास
चालतं समाजाला

पण ती सावळी अन
तो गोरापान असला
तर मात्र अडवलं जात
दोन मनांच्या मिलनाला


Thursday, 26 November 2015

फरक

खरचं फरक पडतो का
तो तिला अहो म्हणतो की
अगं म्हणतो याचा

खरचं फरक पडतो का
तो तिच्यापासून कोसो दुर असतो की
तिच्या कुशीत असतो याचा

खरचं फरक पडतो का
तो अनभिज्ञ असतो की
सगळं जाणतो याचा

खरचं फरक पडतो का
तो तिला रुसवतो की
तिचा रुसवा काढतो याचा

खरचं फरक पडतो का
तो तिला रडताना नुसतंच पाहतो की
अलगद नजर दुर भिरकावत
हळुच आवंढा गिळतो याचा

खरचं फरक पडतो का
तिला या बारीक सारीक गोष्टींचा
नाही.. मुळीच नाही पण

त्याच्या क्षणभरही दुर जाण्याने
मात्र तिच जग जणू बदलून जातं
कारण...
त्याच्या नसण्याचा तिला
नक्कीच अवाढव्य फरक पडतो

Monday, 2 November 2015

फुलपाखराच्या दुनियेतलं पाखरू

पाखरांच्या दुनियेत
त्याच मोठ नाव होतं
आभाळभर पंख पसरत
पाखरू गाणी गात होतं

दमुन भागून एकदा सावलीत
निवांतपणे ते विसावल होतं
सहजच आलं त्याच्या नजरेत
फुलपाखरू फुलांचा गंध नेतं

पाखराने विचार केला क्षणात
फुलपाखरू तरीच इतक सुंदर होतं
पंखावर रंगीत नक्षी मिरवत
फुलपाखरू त्याच्याच तालात होतं

पाखरू गेलं ओळख काढत
अन जमली मैत्री त्या दोघांत
दिवस आता आला मावळत
इतका उशीर ते होते बोलत

निरोपाची वेळ जाते काळीज चिरत
फुलपाखराला आता कळुन चुकत
पाखरू ऊंचआभाळाचा ठाव घेतं
अन फुलपाखरू मात्र फक्त
या फुलावरून त्या फुलावर धाव घेतं