Monday, 5 October 2015

प्रेम म्हणजे काय असतं..?

प्रेम म्हणजे काय असतं म्हणून नुसतं काय विचारता?
ते समजण्यासाठी,
त्याच्यासाठी झुरून बघावं लागतं
तो जवळ असतानाही त्याच्याकडे दुरून बघावं लागतं
तो काहीच बोलला नाही तरी त्याचं मन हेरून बघावं लागतं
त्याच्या सुखाला थोडं परकं आणि दुःखाला आपलं मानुन बघावं लागतं

प्रेम म्हणजे काय असतं म्हणून नुसतं काय विचारता?
ते समजण्यासाठी,
त्याच्या स्वप्नपूर्तीसाठी आपल्या आशा अपेक्षांना मारुन बघावं लागतं
मनाच्या कोपऱ्यात एक घट्ट नातं सैलसरपणे जपुन बघावं लागतं
अहो, नुसती थेअरी वाचून काही समजत नसतं, त्यासाठी प्रॅक्टिकलच करून बघावं लागतं.. ;)

2 comments: