Wednesday, 14 October 2015

You will wonder..!

He often teases her
And she loses her temper
He cares too much and
She is the girl who cares never

When he gets angry with her
At that time also she is the one
Who can again make him feel cheer

He argues with her
She makes him speechless
Although he fights with her, 
He always wants to win her

When he requests God
For her Wellness in his prayer
She absolutely has nothing to utter
With her eyes full of tear

He had never said that to her
But deep in the heart
She knows that he loves her

There may be sadness,
or there may be happiness
They always have an equal share

You should see how they dance together
You should see how they live together
He and she share a relation where
the bond is just meant to last forever

He is my sweet father
And she is his naughty daughter
Yes they love each other
more and more, more and more.

Wednesday, 7 October 2015

एकटेपण

अबोल मन
धगधगत रण
आपलेपणाची चणचण
भकास अंगण
अस्तित्वाची गोठवण
दुःखाची साठवण
मला माझीच आठवण
आदळणारे घन
आयुष्यातले काही रुपेरी क्षण
विचारांची गाळण
आणि शेवटी एक सुंदर स्वप्न
'माझं जीवन'

Tuesday, 6 October 2015

माझं मन

काय होतय तेच कळत नाहीये
इवल्याशा झुळकीबरोबर डुलणारं माझं मन
आज वाऱ्यानेही वळत नाहीये
आज स्वतःला व्यक्त करायला शब्दांचं
भांडारही पुरत नाहीये
खरचं काय होतय तेच कळत नाहीये..

कुणाची आठवण आहे की एखादी
लक्षवेधी आठवणींची साठवण तेच कळत नाहीये
छोट्याश्या विनोदावरही खळखळुन हसणारं माझं मन
आज मोठय़ा विनोदानेही ढळत नाहीये
खरचं काय होतय तेच कळत नाहीये..

हव्या असलेल्या गोष्टी पळत जाऊन घेणारं माझं मन
आज जवळ असलेल्या आनंदालाही धरत नाहीये
नेहमी इतरांची मन खुलविण्यात गुंतलेल्या माझ्या मनाला
आज रुसायलाही एखादं मन मिळत नाहीये
खरचं काय होतय तेच कळत नाहीये...!

Monday, 5 October 2015

प्रिय

प्रिय आई,
तुझ्या ऋणांतून उतराई होणं केवळ अशक्य प्रयत्न
तरीही तुझं हे बाळ नक्की चमकेल बनुन एखादं रत्न

प्रिय श्यामा,
तुला आशा असता दुधाची
मिळो नेहमीच घास सायीचा
तु पार करावास अगदी पर्वतही राईचा
तुला काही कसं उणं पडेल, असता
तुझ्याबरोबर मायेचा हात तुझ्या ताईचा

प्रिय पल्लवी,
मी काय लिहू?
वाचताना तु हसशील
थोडसं रुसशील
पण माझ्यापासून थोडी दूर असशील
तरी तु माझी प्रिय मैत्रीण अगदी प्रियच असशील.

प्रेम म्हणजे काय असतं..?

प्रेम म्हणजे काय असतं म्हणून नुसतं काय विचारता?
ते समजण्यासाठी,
त्याच्यासाठी झुरून बघावं लागतं
तो जवळ असतानाही त्याच्याकडे दुरून बघावं लागतं
तो काहीच बोलला नाही तरी त्याचं मन हेरून बघावं लागतं
त्याच्या सुखाला थोडं परकं आणि दुःखाला आपलं मानुन बघावं लागतं

प्रेम म्हणजे काय असतं म्हणून नुसतं काय विचारता?
ते समजण्यासाठी,
त्याच्या स्वप्नपूर्तीसाठी आपल्या आशा अपेक्षांना मारुन बघावं लागतं
मनाच्या कोपऱ्यात एक घट्ट नातं सैलसरपणे जपुन बघावं लागतं
अहो, नुसती थेअरी वाचून काही समजत नसतं, त्यासाठी प्रॅक्टिकलच करून बघावं लागतं.. ;)

Thursday, 1 October 2015

वो नही है

लिखती तो बहोत हुँ
पर जिसे सुनाना चाहती हुँ
वो नही है..

अपने तो बहोत है
पर जिसे रुलाकर मनाना चाहती हुँ
वो नही है..

ख्वाईशें तो बहोत है इस दिल की
पर जिसके साथ इन ख्वाइशों को पाना चाहती हुँ
वो नही है..

नासमझ हुँ थोडी
पर जिसकी हर एक साँस को समझना चाहती हुँ
वोही नही है..!

जिवंतपणा

नुकत्याच उत्खनन केलेल्या हडप्पा नगरीतले काटकोनी रस्ते पहायला मिळाले तर जसं कितीही आकर्षण वाटलं तरी आपुलकी अन प्रेमाचा कुठेच मागमूसही नसेल तसे भासतात वाडीतले रस्ते.
आजवर सुंदर पुतळ्यावर कुणी प्रेम केलेले ऐकलयं का..?
नाही नं..
कारण साद दिली तर तिथे प्रतिसाद मिळत नाही आणि प्रतिसाद नाही तिथं आपलीच साद पुन्हा ऐकु येते आणि आपल्याला एकटेपणाची जाणीव करून देते.

म्हणूनच जिवंतपणा महत्वाचा..
माणसातला अन नात्यातलाही...!