आज काल प्रेम आटत
चाललंय अस वाटत
उगाचच...
सवयीचे झालेले
वाद
पुन्हा पुन्हा रुसणं
तुला जे रुचत
नाहीय ते
तू न सांगणं
मी तुझ्याकडे
तुझी सारखी
तक्रार च करतेय
अस तुला वाटण
सगळंच रुक्ष रुक्ष...
थोडस
वळून पाहिलं तर
आठवतं मला
किती कौतुक
होत मला
तुझ्या गोड हसण्याच
लग्नाआधी तू मला
घट्ट बिलगून बसण्याच
तू दिलेल्या गुलाबाचं
तुझ्या सोबत
हातात हात
घालून फिरलेल्याचं
ज्या गोष्टी काल
स्वप्नवत वाटायच्या
त्या आज प्रत्यक्ष
वाट्याला आल्यावर
इतक्या गौण कशा
झाल्या असतील
मला तू आवडतोस
अजूनही तितकाच
जितका पहिल्या
भेटीत आवडला होतास
माझा जीव अजूनही
गलबलतो तूझा
निरोप घेताना
अजूनही डोळे
तितक्याचं आतुरतेने
तुझी वाट पाहतात
हे सगळं शब्दात
सांगायचं राहून
गेलं असेल
पण हे सगळं
बदलले नाहीय रे
मी अजूनही
तशीच आहे
तुझ्यासाठी
वेडी..😊
प्रेमाला पुन्हा पुन्हा
व्यक्त नाही केलं
म्हणून रुसू वाटल
असेल का रे..?.
चल दोघे मिळून
त्याचा रुसवा काढू
अन हसत खेळत
त्याला घरी आणू
तुझीच -राणी
No comments:
Post a Comment