Tuesday, 23 February 2016

सांगाल का कुणीतरी..?

तिच्या स्वप्नातली दुनिया न्यारी
उतरेल का सत्यात खरी
अहो सांगाल का कुणीतरी?

दौडत येईल का राजकुमार
घोड्यावर होऊन स्वार
नेण्या तिला सातासमुद्रापार ?

घेऊन तिला मिठीत अलवार
स्पर्शैल जेव्हा तो तिला हळुवार
होईल का ती लाजुन चुर..?

ओढेल जेव्हा तो तिला समीप
सांगा उजळतील का
तिच्या मनाचे दीप..?

भिडेल जेव्हा नजरेस नजर
दिसेल का डोळ्यात त्याच्या
प्रेमाचा अथांग सागर..?

अहो सांगाल का कुणीतरी
उतरेल का सत्यात खरी
तिच्या स्वप्नातली दुनिया न्यारी...?

Wednesday, 27 January 2016

... पुजती रहेगी तेरी मुरत..!

कैसे बया करु मै अपनी ये चाहत
महसुस कर कभी,
मेरे दिल की धडकन
तेरे बिना दिल को एक पल भी नही राहत

तुझे दिन रात सपनों मे देखु, है ये मेरी फितरत
देखना मेरी आँखो मे कभी,
खुद की तसवीर
पर तु है के तुझे मेरी तरफ देखने की भी नही फुरसत

तेरी खुशी की ही मैने मांगी हमेशा मन्नत
झांकना मेरी रुह में कभी,
शायद तब पता चले
साथ होने से तेरे दुनिया बन गयी थी मेरी जन्नत

एक पल मे तुने बदल दी अपनी सुरत
फिर भी,
तु जान ले के
ये मीरा समझकर तुझे शाम, पुजती रहेगी तेरी मुरत..!

Friday, 27 November 2015

रंग

प्रेम जुमानतं का रंगाला..?
प्रेम.. आंधळच ते...
भुलत नाही ते
चेहर्‍याच्या सुंदरतेला

प्रेम करणाऱ्यांची
दुनियाच रंगीन असते
प्रेमच असते
जे जीवनात रंग भरते

म्हणून काही प्रेम
रंगांधळे नसते
त्यालाही कळतात रंग
रंग मनाचे

दोन रंग वेगवेगळे
एका नव्या रंगाला जन्म देतात
तेव्हा किती सारं प्रेम मिळत
त्या नवजात रंगाला

जर प्रेम जुमानत
असत रंगाला
तर राधा भाळली असती
का कृष्णाला ?

त्याचा काळा अन तिचा
रंग गोरापान असला
तर हमखास
चालतं समाजाला

पण ती सावळी अन
तो गोरापान असला
तर मात्र अडवलं जात
दोन मनांच्या मिलनाला


Thursday, 26 November 2015

फरक

खरचं फरक पडतो का
तो तिला अहो म्हणतो की
अगं म्हणतो याचा

खरचं फरक पडतो का
तो तिच्यापासून कोसो दुर असतो की
तिच्या कुशीत असतो याचा

खरचं फरक पडतो का
तो अनभिज्ञ असतो की
सगळं जाणतो याचा

खरचं फरक पडतो का
तो तिला रुसवतो की
तिचा रुसवा काढतो याचा

खरचं फरक पडतो का
तो तिला रडताना नुसतंच पाहतो की
अलगद नजर दुर भिरकावत
हळुच आवंढा गिळतो याचा

खरचं फरक पडतो का
तिला या बारीक सारीक गोष्टींचा
नाही.. मुळीच नाही पण

त्याच्या क्षणभरही दुर जाण्याने
मात्र तिच जग जणू बदलून जातं
कारण...
त्याच्या नसण्याचा तिला
नक्कीच अवाढव्य फरक पडतो

Monday, 2 November 2015

फुलपाखराच्या दुनियेतलं पाखरू

पाखरांच्या दुनियेत
त्याच मोठ नाव होतं
आभाळभर पंख पसरत
पाखरू गाणी गात होतं

दमुन भागून एकदा सावलीत
निवांतपणे ते विसावल होतं
सहजच आलं त्याच्या नजरेत
फुलपाखरू फुलांचा गंध नेतं

पाखराने विचार केला क्षणात
फुलपाखरू तरीच इतक सुंदर होतं
पंखावर रंगीत नक्षी मिरवत
फुलपाखरू त्याच्याच तालात होतं

पाखरू गेलं ओळख काढत
अन जमली मैत्री त्या दोघांत
दिवस आता आला मावळत
इतका उशीर ते होते बोलत

निरोपाची वेळ जाते काळीज चिरत
फुलपाखराला आता कळुन चुकत
पाखरू ऊंचआभाळाचा ठाव घेतं
अन फुलपाखरू मात्र फक्त
या फुलावरून त्या फुलावर धाव घेतं

Tuesday, 27 October 2015

श्री

मला काय वाटतं
तुझ्याबद्दल...

मला वाटतं
एक हृदय इतक सुंदर
कसं काय असु शकतं..

मला वाटतं..
एक हृदय इतक अमाप
प्रेम कसं काय करू शकतं..

मला वाटतं..
की तुझा हात हातात असावा
अन् अखंड चालत रहावं

मला वाटतं..
की तुझ्याकडे अशी काय जादू आहे
ज्याने मन तुझ्याकडे ओढ घेई

मला वाटतं..
जर आपण एकत्र असु
तर ढळणार नाही माझ्या चेहर्‍यावरचे हसु

मला वाटतं..
आता तुझ्या भेटीची आहे मज आस
अन तुझ्याच सोबतीचा ध्यास..!

मला वाटतं..
तुला लाभो उदंड आयुष्य
अन भरभरून येवो जीवनात तुझ्या हर्ष..!

Saturday, 24 October 2015

वेडावून टाके मला हे गुज

तोडून टाकले सारे मी रिवाज
तरी सांगायला तुला मन धजेना आज

तुझ्याच स्पर्शाने माझ्या कांतीचे उजळले तेज
हर्षुन जाई मन ऐकून तुझाच आवाज

तु आहेस म्हणून मन प्रफुल्लित रोज
तुझ्याच विचारांत बुडून जाते माझी हरएक सांज

तुच करतोस माझ्या दिलावर राज
तरी तुलाच सांगायला येई आडवी ही लाज

का असे वेडावून टाके मला हे गुज..!